गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह ; एकूण संख्या २,३२५ वर

Corona Virus police positive

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गेल्या २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल एका पोलिसाने कोरोनामुळे जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितात पोलिसांची संख्या आता २ हजार ३२५ इतकी झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य प्रशासनासह महाराष्ट्र पोलीस दलदेखील दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पोलिसांनाही होत असून ही संख्या आता वाढत चालली आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईतील कोरोनाबाधित  पोलिसाचा मृत्यू;  डिस्चार्ज मिळून झाले होते चार तास 

राज्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना सतर्क करणं, त्यांच्या मदतीस धावून जाणाऱ्या पोलिसांचा दिलदारपणा आपण पाहात आहोत. मात्र नागरिकांना संरक्षण देताना पोलीस दलावर आता कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची ही संख्या आटोक्यात आणण्याची गरज आहे.

दरम्यान राज्यात आतापर्यंत २६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण ९७० पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER