महाशिवरात्री विशेष : विठुमाऊलीच्या मंदिरात तब्बल १०० किलो बेलाच्या पानांची आरास

maha-shivratri-celebration-in-vitthal rukmini temple pandharpur

मुंबई :- ‘महाशिवरात्री’चा उत्सव पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल रुक्मिणी’ मंदिरात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंदिर महाशिवरात्री निमित्त आकर्षक फुलांनी सजवले आहे. महादेवाला प्रिय असलेल्या तब्बल १०० किलो बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदि ठिकाणी ही आरास केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

कोल्हापुरात महाशिवरात्रीची लगबग