‘काँगो’ तापाबाबत पालघर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

Congo Fever

पालघर : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे जनता आणि प्रशासन हैराण असताना पालघर जिल्ह्यात क्रायमिन काँगो (Crimean Congo Fever) तापाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची काळजी वाढली आहे. हा ताप प्रामुख्याने जनावरांना होतो. मात्र, काही रुग्णांत या रोगाचे लक्षण आढळले आहेत.

गुजरातमध्ये अशी प्रकरणे लक्षात आली आहेत. हा आजार गुजरातच्या सीमा प्रदेशातून महाराष्ट्रात येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी. कांबळे यांनी एक परिपत्रक काढून प्रशासनाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. या पत्रकात म्हटले आहे की, गुजरातमधील काही भागांत नागरिकांना हा ताप आला आहे.

वेळीच योग्य उपचार केले तर धोका उद्भवत नाही. मात्र, दुर्लक्ष केले तर रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. या आजारात रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण ९ ते ३० टक्के आहे. हा आजार प्राण्यांच्या बाबतीत संसर्गजन्य आहे. मात्र माणसांना तो रुग्ण प्राण्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने किंवा रुग्ण प्राण्याचे मांस खाल्ल्याने होतो.

जगभरातही Congo Hemorrhagic Fever आल्याची माहिती आहे. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, कांगो, इराण, बल्गेरिया आदी देशांमध्ये या तापाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात अद्याप तरी या आजाराचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र, यामुळे निश्चिंत राहण्याचे कारण नाही. प्रशासन सतर्क आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने योग्य काळजी घेण्याच्या सूचना शेतकरी आणि पैशुवैद्यकांना दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER