उद्धव ठाकरे-पवार सरकारवर आता विश्वास राहिला नाही : खासदार छत्रपती संभाजीराजे

Sharad Pawar-CM Thackeray-Sambhajiraje

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . विरोधक नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे .आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याचे असे सरकारी वकिलांनीच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणते पाऊल उचलणार आहे? येत्या २५ जानेवारीला न्यायालयात जी अंतिम सुनावणी होणार आहे, सरकारची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न पडला आहे. सरकार हतबल झाल्याचीच शंका आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही, अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी केली.

आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला ‘इडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. २४) छत्रपती संभाजीराजे बोलत होते. छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दि. २५ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीत मला गडबड वाटू लागली आहे. आजवर मी नेहमी राज्य सरकारची बाजू घेत होतो. सरकारच्या बाबतीत सकारात्मक होतो. मात्र, यात काही धोका झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार राहणार आहे.

ही बातमी पण वाचा : EWS मधून आरक्षण ; मराठा नेत्यांमध्ये पडलेत दोन गट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER