महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही ; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली ग्वाही

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्वाधिक करोनाबाधित आढळलेल्या १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. पंतप्रधानांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कोरोनाशी संबंधीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने “कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रदान मोदींना सांगितले. तसेच, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना बरे झाल्यानंतरही अन्य आजार झाल्याचे निदर्शनास आले असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) , अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Harshavardhana) यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार विविध राज्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते.

यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती दिली. “कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेल्या प्रत्येक केस बाबत महाराष्ट्राने पारदर्शकता ठेवली.

कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे. परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरु असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं.
याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली.

राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली.

त्याचप्रमाणे, राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER