अखेर सिरोंचा वासियांचं स्वप्न होणार पूर्ण; गोदावरी नदीवरील पुलाचं राज्यपाल यांच्या हस्ते लोकार्पण

Godavari in Gadchiroli

गडचिरोली : गेल्या शंभर वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील नागरिकानी पाहिलेलं गोदावरी नदीवरील पुलाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. आजचा दिवस सिरोंचावासियांसाठी ऐतिहासिक असणार आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून सुमारे सतराशे किलोमीटरवर असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित असणार आहेत.

हा भाग अतिसंवेदनशील असल्यानं तसेच या भागात पहिल्यांदाच इतके मंत्री येत असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. त्यामुळे या भागाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय.