सरपंच, उपसरपंच निवडणुकीत जादूटोणा!

Magic

पुणे : राज्यात जिथे ग्रामपंचायतची निवडणूक झाली आहे तिथे आता सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. जिथे विजयासाठी सदस्य कमी पडत आहेत तिथे फोडाफोडी सुरू आहे. पुणे परिसरात यात जादूटोण्याचीही भर पडली आहे!

पुण्यातील मावळमधील टाकवे गावात ग्रामपंचायत सदस्यांवर जादूटोणा (करणी)चा प्रयोग होत असल्याचे लक्षात आले आहे. ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषिनाथ शिंदे यांची नावे लिंबांवर लिहून ते खिळ्यात अडकवून, ते खिळे मारलेले तीन लिंब इंद्रायणी नदीतील पिंपळाच्या झाडावर ठोकण्यात आले होते.

अविनाश असवले यांनी याबाबत वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सरपंच, उपसरपंच निवडप्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आले असावे. जादूटोण्याच्या प्रकारातून भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी, असवले यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही या प्रकरणाची दखल घेतली. अशा प्रकारे समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER