आणि माधुरीचे नाव नीलमच्या अगोदर लागले

Neelam-Madhuri Dixit

चित्रपटातील कलाकार चित्रपटांच्या नामावलीत आपले नाव कसे येते याकडे बारकाईने लक्ष देतात. आपला अनुभव आणि वरिष्ठता नामावलीत दिसली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. अनेकदा नवीन कलाकारही आपल्या नावाबाबत आग्रही असतात. अशाच नामावलीत अगोदर कोणाचे नाव यावरून माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नीलममध्ये वाद झाला होता. पण माधुरीचा पहिला चित्रपट नीलमच्या चित्रपटाच्या अगोदर प्रदर्शित झाला असल्याने अखेर माधुरीचे नाव नीलमच्या (Neelam) नावाअगोदर दाखवण्यात आले.

Khatron Ke Khiladi (1988) - IMDb

हा चित्रपट होता खतरों के खिलाडी. प्रख्यात दिग्दर्शक टी. रामाराव यांनी धर्मेंद्र, संजय दत्त, चंकी पांडे, नीलम आणि माधुरीला घेऊन या चित्रपटास सुरुवात केली होती. चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित होणार होता. प्रमोशनसाठी ट्रेलर आणि पोस्टर्स छापण्यात आले. परंतु यात माधुरीचे नाव सगळ्यात शेवटी होते. माधुरीचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथ याने याला आक्षेप घेतला आणि माधुरी नीलमपेक्षा सीनियर असल्याने माधुरीचे नाव अगोदर पाहिजे असा हट्ट धरला.

रामा राव यांनी माधुरी नीलमपेक्षा सीनियर आहे हे सिद्ध करण्यास सांगितले. रिक्कूने लगेचच माधुरीच्या अबोधच्या प्रदर्शनाची आणि नीलमच्या जवानी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा मिळवल्या. दोन्ही चित्रपट 1984 मध्येच प्रदर्शित झाले होते परंतु अबोध जवानीच्या अगोदर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे रामा राव यांनी नव्या पोस्टर्स, जाहिराती आणि चित्रपटाच्या नामावलीत नीलमच्या अगोदर माधुरीचे नाव टाकले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER