सिनेसृष्टीतील गरजू कलावंतांसाठी धक धक गर्ल माधुरी दीक्षितने केली मदत

Madhuri Dixit

मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित गरजूंच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिने चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत केली आहे.

लॉकडाऊनमुळे कलाविश्वातील कामकाजदेखील ठप्प झालं असून या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ या गरजूंना आर्थिक तसंच अन्नधान्य पुरवून मदत करत आहे. आतापर्यंत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून दोन हजार गरजूंपर्यंत मदत पोहचविण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता गरजूंची संख्या वाढत असल्यामुळे महामंडळाने कलाविश्वातील सेलिब्रिटींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे महामंडळाने केलेल्या या आवाहनाला माधुरीने प्रतिसाद दिला आहे. तिने आर्थिक मदत केली आहे.

माधुरीने मदत केल्यानंतर अ.भा.म.चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितचे आभार मानले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER