माधुरी आणि रविना करणार होत्या हम साथ साथ है मध्ये काम

Madhuri Dixit - Raveena Tandon

राजश्री प्रोडक्शन (Rajshri Productions) आणि सूरज बरजात्या (Sooraj Barjatya) कौटुंबिक चित्रपट बनवणारे निर्माते म्हणून ओळखले जातात. अगदी जुन्या काळातल्या ‘दोस्ती’पासून ते ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘मैं प्रेम की दिवानी हूं’पर्यंत असे अनेक चित्रपट राजश्रीने तयार केलेले आहेत. हे सर्वच चित्रपट मोठ्या पडद्यावर तर हिट झालेच. छोट्या पडद्यावरही प्रचंड हिट आहेत. राजश्रीचा ‘हम साथ साथ हैं’ छोट्या पडद्यावर नेहमी दाखवला जातो. 21 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबतची एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सूरज बरजात्या या चित्रपटात प्रथम माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांना घेणार होता.

या मल्टीस्टारर चित्रपटात सलमान खान, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे, तब्बू, सैफ अली खान आणि मोहनीश बहल यांनी काम केलेले आहे. चित्रपटाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सूरजने माधुरी दीक्षित आणि रविना टंडनला साईन करण्याचा विचार केला आणि त्यांना संपर्क केला. माधुरी दीक्षितला चित्रपटात मोठ्या वहिनीची भूमिका सूरज देत होता. परंतु सलमान आणि सैफची नायिका म्हणून काम करीत असताना त्यांच्या वहिनीची भूमिका साकारणे करिअरला चांगले होणार नाही म्हणून माधुरीने नकार दिला. आणि तिच्या जागी तब्बूची निवड झाली. तर रविनाला सलमानच्या नायिकेचा रोल ऑफर करण्यात आला होता. परंतु रविना आणि सलमानमध्ये काही कारणाने वितुष्ट आल्याने तिने काम करण्यास नकार दिला होता. रविनाने नकार दिल्यानंतर सोनाली बेंद्रेला सलमानची नायिका बनवण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER