मधूर भांडारकर यांनी करण जोहरवर त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक चोरल्याचा केला आरोप

Madhur bhandarkar & Karan Johar

नेटफ्लिक्स ने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील सेलेब्रिटीजच्या पत्‍नींना घेऊन एक वेब रियलिटी शो Fabulous Life Of Bollywood Wives चा ट्रेलर रिलीज केला होता. हा वेब रियालिटी शो प्रख्यात निर्माता दिग्दर्शक करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी तयार केलेला आहे. मात्र या वेब सिरीजच्या शीर्षकावर मधूर भांडारकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे शीर्षक माझे असून मी करण जोहरला देण्यास नकार दिला असतानाही त्याने हे शीर्षक वापरले असा आरोप करीत, करणने हे शीर्षक बदलावे असे सांगितले आहे.

नेटफलिक्स ने रिलीज केलेल्या ट्रेलरनंतर

मधुर भांडारकरने याबाबत एक ट्वीट केले आहे. ट्विटमध्ये मधुर म्हणतो, प्रिय करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी माझ्याकडे त्यांच्या वेब शो साठी बॉलीवुड वाइव्स शीर्षक मागितले होते. मी त्याला नकार दिला होता. कारण या नावाने मी चित्रपट तयार करीत असून त्याचे काम सुरू आहे. असे असतानाही मी तयार करीत असलेल्या चित्रपटाच्या शीर्षकाच्या अगोदर द फॅब्युलस असा शब्द जोडून या दोघांनी वेब शोची निर्मिती केली आहे. हे मात्र हे संपूर्णपणे अनैतिक आणि चुकीचे आहे. कृपा करून, माझा प्रोजेक्ट नष्ट करू नका मी तुम्हाला नम्र पूर्वक विनंती करतो की तुम्ही तुमच्या वेब शोचे शीर्षक बदला.

फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स य रियालिटी शोमध्ये बॉलीवुड स्टार्सच्या पत्नीचे जीवन दाखवले जाणार आहे. यात संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची अभिनेत्री पत्नी नीलम कोठारी यांचे जीवन दिसणारं आहे. बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीचे जीवन दाखवणारा हा पहिलाच शो आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी, संजय कपूर, समीर सोनी, अनन्या पांडेय, संजय कपूरही दिसत आहेत. 27 नोव्हेंबर पासून नेटफ्लिक्स वर या शोचे प्रसारण होणार आहे.

मधुर भांडारकरच्या ट्विट नंतर करण जोहरने अजून तरी याला उत्तर दिलेले नाही. करण जोहरने नाव बदलले नाही तर मधूर भांडारकर न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER