‘मधा’ने करा डार्कसर्कल गायब

Honey

अपुरी झोप आणि तणावाने आपल्या डोळ्याखाली डार्कसर्कल येतात. मघ त्याला लपविण्याकरिता आपण कन्सिलर, फाॅऊनडेशन अशे प्रोड्क्टस वापरतो. पण फक्त लपवून चालणार नाही ना. या वर घरगुती उपाय म्हणजे ‘मध’. मधात नैसर्गिक रूपात ब्लिचिंग गुण आढळतात ज्याने सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर करण्यात मदत मिळते. याच्या अॅटीऑक्सीडेंट प्रकृतीमुळे डार्क सर्कलवरही हे खूप प्रभावी ठरतं. या मधाचा उपयोग तुम्ही खालील पाच प्रकारे करू शकता.

शुद्ध मध :- डार्क सर्कल वर मधाची एक पातळ लेअर लावा आणि २० मिनिटापर्यंत हळूवार मालीश करा. नंतर पाण्याने धुऊन टाका.

मध आणि केळ :- एका बाऊलमध्ये मध आणि तेवढ्या प्रमाणात केळ मिसळा. डार्क सर्कल्सवर लावून एका तासासाठी तसेच राहून द्या. हवं तर यात अंड्याचा पांढरा भागही सम प्रमाणात मिसळू शकता.

मध आणि दूध :- १ चमचा कोमट दुधात मध मिसळा आणि हे मिश्रण डार्क सर्कलवर लावा. २० मिनिटाने पाण्याने धुऊन टाका आणि हलक्या हाताने मुलायम टॉवेलने पुसून घ्या.

मध आणि बदाम :- सम प्रमाणात मध आणि बदामाचे तेल मिसळा. हे डोळ्या जवळच्या भागाला लावून हलक्या हाताने मालीश करा. रात्री असेच राहून द्या. सकाळी उठून घुऊन टाका.

मध, व्हि‍टॅमिन इ आणि अंड्यातील पांढरा भाग :- व्हिटॅमिन इ कॅप्सूल वाटून त्यात मध आणि अंड्यातील पांढरा भाग मिसळा. हे मिश्रण डोळ्याखाली लावा. वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका.हे उपाय नियमित करा आणि डोळ्या खालील डार्क
सर्कल दूर करा.