
नवी दिल्ली :- कोरोनाविरुद्धच्या (Corona) युद्धात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण होती. ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’ (Hydroxychloroquine) जगाला पुरविण्यात भारत अग्रेसर होता. जगाला कोरोना लसीच्या पुरवठ्यात भारतच अग्रेसर असणार आहे. जगभरातील अनेक देशांनी आतापासूनच भारताकडे लसीची मागणी नोंदविली आहे. काही देश थेट लस बनविणाऱ्या कंपन्यांशी करार करत आहेत.
अल्प उत्पन्न गटात मोडणाच्या देशांना कोव्हॅक्स अलायन्स च्या माध्यमातून लस उपलब्ध होणार आहे. या श्रेणीत ९२ देश मोडतात. पाकिस्तान वगळता बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान या सर्व शेजारी देशांना भारत लसीचा पुरवठा करणार आहे. अफगाणिस्तान, मालदिवनेही भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. ब्राझील, मोरोक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, दक्षिण आफ्रिकेने ‘मेड इन इंडिया’ लस वापरणार असल्याची औपचारिक घोषणाही केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला