शिवसैनिकांनी मारहाण केलेले अधिकारी मदन शर्मा घेणार राज्यपालांची भेट

Madan Sharma - Governor Bhagat Singh Koshyari

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना शिवसैनिकांनी (Shiv Sena) मारहाण केली. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . यापार्श्वभूमीवर मदन शर्मा हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.कांदिवली इथं राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती.

या प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि जामीन मिळाला आहे. यामध्ये 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते. आज माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. दुपारी 12 वाजता इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER