‘ श्रीमान योगी ‘कारांच्या जावयाच्या हत्येची चौकशी एसआयटीमार्फत ,मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई – थोरले बाजीराव यांच्या जीवनावर स्वामी तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर श्रीमान योगी अशा अत्यंत नावाजलेल्या आणि वाचकप्रिय कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात लेखक दिवनगर रणजित देसाई यांचे जावई आणि कोल्हापुरातील एक प्रथितयश उद्योजक मदन नाईक यांच्या अपहरण व हत्येची विशेष चौकशी पथकाने मार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री दिले. त्यामुळे आता या हत्येचा उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

रणजित देसाई हे कोल्हापूरकरांचे भूषण भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते. त्यांचे जावई असलेले मदन नाईक हे उद्योजक आणि अत्यंत प्रगतिशील असे शेतकरी होते. 25 जानेवारी 2019 रोजी त्यांचा मृतदेह कारदगा, ता. चिक्कोळी, जिल्हा बेळगाव येथेहातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता.

ही बातमी पण वाचा : धक्कादायक : औरंगाबादच्या महिला नगरसेविकेवर पुण्यात पाशवी बलात्कार

याप्रकरणी कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र गेली 4 महिने याप्रकरणी कुठलाही ठोस पुरावा कर्नाटक पोलिसांना हाती आलेला नाही. कोणत्याही आरोपीला पोलीस अटक करू शकले नाहीत. कर्नाटक पोलिसांच्या या अपयशाच्यापार्श्वभूमीवर नाईक यांच्या पत्नी आणि रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, रणजित देसाई यांच्या पत्नी मृणालिनी तसेच पानिपतकार विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी रात्री मुंबईत वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

कर्नाटक पोलिसांना आतापर्यंत तपासात काही हाती लागलेले नाही, याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नाईक यांचा मृतदेह कर्नाटकात आढळला असला तरी त्यांचे अपहरण कोल्हापूरजवळ करण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या अपहरणाचा व त्यानंतरघडलेल्या हत्येचा तपास करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या प्रकरणी तत्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश दिले.

ही बातमी पण वाचा : नियती उद्या चालून हिशेब तर चुकता करणार नाही ना ??