मा. गो. वैद्य अनंतात विलीन

नागपूर :- ज्येष्ठ विचारवंत व संपादक, हिंदुत्वाचे भाष्यकार, ‘तरुण भारत’ चे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचारप्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) अंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा धनंजय याने अग्नी दिला.

सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule), भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त व चाहते उपस्थित होते.

रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे घर ८०, विद्याविहार, प्रतापनगर, येथून अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी घाटावर दोन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता रेशीमबाग येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

अंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सांत्वन केले. ते म्हणालेत, वैद्य यांच्या जाण्याने संघाचा शब्दकोश हरवला. ते संघविचार जगले. सल्लामसलत करण्याचे ते हक्काचे स्थान होते. आता काही विचारायचे ते कुठे, असा रिक्तपणा निर्माण झाला आहे. जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER