भारत जिंकणाऱ्या इंग्रजांना पुरून उरलेलं नवाबांचं शहर म्हणजे लखनऊ!

Maharashtra Today

ज्या शहराला आज लखनऊ (Lucknow) म्हणून ओळखलं जातं ते कधीकाळी ‘अवध’ होतं. आजच्या लखनऊपेक्षा अवधची सीमा मोठी होती. आयोध्यानगरी अवधची राजधानी होती. यानंतर फैजाबाद आणि मग लखनऊ अवधची राजधानी बनलं.

लखनऊची ओखळ आज नवाबांच शहर (Lucknow is the city of the Nawabs) अशी आहे. अवधमध्येच नवाबांचा इतिहास सुरु होतो. १७२२ पासून. जेव्हा सआदत अली खाननं अवधमध्ये सत्ता गाजवायला सुरुवात केली. दिल्लीच्या मुघलानंनी अवधवर शासन करण्यासाठी सआदत खान यांना नियुक्त केलं होतं. तर वाजिद अली खान हे शेवटचे नवाब होते. इंग्रजांच्या कैदेत २१ सप्टेंबर १८८७ ला कलकत्त्यात त्यांचा मृत्यू झाला. युरोपातल्या बऱ्याच देशांची अवध जिंकण्याची इच्छा होती. अवधच्या नवाबांनी शेवटपर्यंत इंग्रजांशी लढा दिला. शरणागती पत्कारली नाही. यानंतर मुघलांशी हात मिळवणी करत त्यांनी १७६४ साली बक्सरच्या ऐतहासिक लढ्यात ही सहभाग घेतला होता. या निर्णयाक लढ्यात इंग्रजांचा विजय झाला असला तरी त्यांना अवधवर कब्जा करता आला नाही.

यानंतर अवध ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी अनेकदा हल्ले केले. काही हल्ल्यात ते यशस्वी झाले; पण पुर्ण अवध ते जिंकू शकले नाहीत. अवधनं १८५७च्या उठावातही सक्रीय सहभाग घेतला होता. इंग्रजांची पळता भूई थोडी केली होती. अवध संस्थान शेवटपर्यंत इंग्रजांशी लढत राहीलं पण कधीच त्यांच्या समोर त्यांनी पाय टेकले नाहीत.

आधी गजनी आणि नंतर मुघलांनी केलं होतं शासन

लखनऊवर सर्वात आधी महुम्मद गझनीचा ताबा होता असं इतिहासकार मानतात. यानंतर १५२६ मध्ये हुमायुनं हा प्रांत जिंकला. यानंतर लखनऊ पुर्णपणे मुघल साम्राज्याच्या छत्राखाली होतं. अकबरच्या शासन काळात शेख अब्दूल रहमान यानं लखनपुर आणि आसपासच्या क्षेत्रातलं जाहगिरदार बनवलं. शेख अब्दूला रहीमनं इथं ऐतहासिक मच्छी महाल आणि त्याच्या पत्नींसाठी पाच महाल बांधले.

१७२२ साली बुरहान-उल- मुल्क-मीर महम्मद अमीन मुसावी सआदत खान उर्फ सआदत खानची नियुक्ती अवधवर करण्यात आली. तेव्हा त्याला वजीर उल मुल्क म्हणलं जायचं. त्याच्या नियुक्तीनंतर त्यानं शेख अब्दूल रहीम यांचा वंश शेख जादासच्या नाराजीचा सामना करावा लागला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. सआदत खानच्या प्रशिक्षित सैन्यानं शेख जादासचा धुव्वा उडवला. अवधच्या नवाबांचं राज्य सुरु झालं होतं.

लखनऊच्या संस्कृती, कला आणि जीवनशैलीवर नवाबांचा प्रभाव होता. १८ व्या आणि १९ व्या शतकात नवाबाच्या कार्यकाळत या शहरान प्रगती केली. जुन्या लखनऊ शहराला वसण्याचं श्रेय चौथा नवाब असफउद्दौला याला जातं.

अवधमध्ये इंग्रजांचा शिरकाव

५ ऑक्टोबर १७५४ साली नवाब जलालुद्दीन शुजाऊद्दोला हैदरच्या शासन काळात इंग्रजांनी अवधमध्ये प्रवेश केला. २२ ऑक्टोबर १७६४च्या ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या विरुद्ध बक्सरच्या युद्धात शुआजउद्दौलानं बंगालच्या मीर कासीम आणि मुघल शासक शाह आलम यांच समर्थ मिळवलं होतं. याआधी शुजाउद्दौलानं अहमद शाह अब्दालीसोबत मिळून मराठ्यांच्या विशाल फौजेचा पराभव केला होता; पण बक्सरच्या युद्धात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

यानंतर इस्ट इंडीया कंपनीकडून ५० लाख रुपये घेतले अवध राज्य त्यांनी इंग्रजांच्या हवाली केलं. यानंतर आसफुद्दौलाच्या शासन काळात अवधची राजकारणात मोठे बदल झाले. ईरान आणि इराकच्या शियांची तिथं संख्या वाढू लागली.

अल्पावधीतच अवधमध्ये शिया संस्कृतीचा उदय झाला. शिया प्रवाशांनी अवधला बौधिक शिक्षणाचं केंद्र म्हणून विकसीत करायला सुरुवात केली. याच वेळेत आसफुद्दौलानं दौलत खानचं निर्माण केलं आणि १७८४ ला रुमी दरवाजा आणि इमामबाडा बांधून घेतला.
इंग्रजांना लखनऊमध्ये महालांची बांधणी आवडायची. जनरल क्लाउट मार्टीन यांनी दहा लाख सुवर्ण मुद्रांच्या बदल्यात महाल खरेदी करण्याचा प्रस्ताव आसफुद्दौला समोर ठेवला होता.

इंग्रजांसमोर झुकले नाहीत नवाब वाजिद अली

१३ फेब्रुवारी १८४७ साली नवाब अजमद अली शाह यांच्या मृत्यूनंतर वाजित अली शाह अवध नवाब बनले. वाजिद अली शाह अवधचे स्वतंत्र शासक आणि नवाब बनले होते. त्यांना इंग्रजांसमोर झुकण मान्य नव्हतं. अवधचे नवाब वाजिद अली शाह रोगाचा सामना करत असतानासुद्धा राज्याचं नेतृत्व करत होते. इंग्रजांनी अवधला कंगाल आणि कमजोर बनवण्याची पुरती तयारी केली होती पण अवधचे नवाब अवधला पुन्हा ऐश्वर्य संपन्न बनवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांची तब्ब्येत त्यांना साथ देत नव्हती. इंग्रजांशी प्रतिकार होणार हे स्पष्ट व्हायला आलं होतं.

यासाठी वाजिद अली यांनी सैन्य संघटीत करायला सुरुवात केली. सैन्याला मजबूत बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते रोज लखनऊमध्ये सैन्याची परेड करवून सलामी स्वीकारायचे. इंग्रजांचे कान टवकारले गेले. इंग्रज अधिकाऱ्यांनी दबावतंत्र वापरत नवाबाला परेडला जाण्याापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची सुरुवात केली; पण यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. १८५६ साली त्यांनी इंग्रज सरकाराला शरण जाणं अमान्य केल. पुढच्या वर्षी १८५७च्या स्वातंत्र संग्रमात अवधनं उडी घेतली. यावेळी नवाब वाजिद अळी माटीयाबुर्जमध्ये होते. इंग्रजांनी त्यांना कैद केलं. यानंतर ३० वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

यानंतर त्यांच्या पत्नी बेगम हजरत महल यांनी इंग्रजांचा प्रतिकार केला. पण त्यांची ताकद दिवसेदिवस कमी पडत होती. इंग्रज एकानंतर एक राज्य जिंकत सामर्थ्यशाली होत होते. १८५७ च्या लढ्याचा दुर्दैवी अंत झाला. ७ जानेवारी १८५९ ला इंग्रजांनी पुर्णपणे अवधचा ताबा मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button