किमान कोरोना काळात गॅसच्या किंमती कमी करा; सुप्रिया सुळेंची पंत्रप्रधानांना विनंती!

PM Modi - Supriya Sule - Maharashtra Today

मुंबई :- एक वर्षापासून देशभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. या काळात लॉकडाउन आणि उद्योगधंदे बंद पडल्या आहेत. देशावर आर्थिक संकट ओढवले आहे. सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन (Lockdown) आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांचे उद्योगधंदे आणि रोजगार संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) मागणी केली आहे. कोरोनाच्या महामारी काळात सामान्यांना दिलासा मिळावा,अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत ट्विट केले आहे. “देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प आहेत. अशा परिस्थितीत जनतेची क्रयशक्त देखील घटली असून अनेक कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीतही स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर रु. ८०० च्या पार पोहोचले आहे. अनेकांना ही रक्कम परवडत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे जनता त्रस्त आहेत.

“समाजातील बहुतांश घटक गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे त्रस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणांस नम्र विनंती आहे की, किमान कोरोना काळात तरी जनतेची आर्थिक स्थिती लक्षात घेता कृपया गॅसच्या किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा पद्धतीने कमी करण्याबाबत सकारात्मक विचार करावा. यावर विचार करून सर्वसामान्यांना दिलासा द्याल हा विश्वास आहे.” अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Disclaimer :-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button