पुण्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा राग अनावर

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . पुण्यात सर्वाधिक थैमान पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील कोव्हिड सेंटरमध्ये (Covid Center) निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्यामुळे शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार सर्वांच्या समोर आणला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना तोंड देताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकार (Thacekray govt) अडचणीत सापडले आहे .

ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदर जिल्ह्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. तसेच ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास आपण रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या (Remdesivir Injections) पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन करु, असा इशाराही शिवतारे यांनी दिला.

माझी भूमिका ही महाविकासआघाडी सरकारच्या (MVA Govt) विरोधात नाही. मी प्रशासनावर नाराज आहे. जिल्हाधिकारी, FDA यांच्या कामावर माझा आक्षेप आहे. पुरंदर जिल्ह्यात कोरोनाचे 1800 रुग्ण असताना केवळ 225 रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळाली. लसीकरणाबाबतही पुरंदर जिल्ह्यासोबत अन्याय झाला, अशी टीकास्त्र विजय शिवतारे यांनी सोडले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button