लव जिहाद : मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी दिले जातात १० ते २५ लाख; साध्वी प्राची यांचा आरोप

Sadhvi Prachi

लखनौ : विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी आरोप केलं की, मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जातो. यासाठी अरब देशांमधून पैसा येतो.

सरकारने या घटनांची चौकशी करण्याची गरज आहे. लव जिहाद करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी त्यांनी लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना केली. अरब राष्ट्रांमधून येणाऱ्या पैश्यामुळे हा प्रकार वाढीस लागला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी १० ते २५ लाखांचा निधी दिला जातो. काही दिवसांपूर्वी मंदिरात नमाज पठनाचा एक प्रकार घडला होता. साध्वी प्राची यांनी हा प्रकार षडयंत्र असल्याचे म्हटले.

धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणाऱ्यांना साध्वीने टोमणा मारला – देशात भाईचारा गँग सक्रिय आहे, त्यांना मी इतकच सांगू इच्छिते की देशात एकता कायम रहावी यासाठी मी लखनौच्या मशिदीत हवन करु इच्छिते! साध्वीच्या या विधानावर देशातील संतांची सर्वात मोठी परिषद आखाडा परिषदेने प्रतिक्रिया दिली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी म्हणाले साध्वी प्राची यांनी प्रक्षोभक वक्तव्य करण टाळले पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER