सासूवर जडले प्रेम; अडथळा ठरलेल्या सासऱ्याचा जावयाने केला खून!

Murder

बांका : बिहारमधील बांका जिल्ह्यातील लौढिया गावात एका युवकाचे सासूवर प्रेम जडले आणि त्याने प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सासऱ्याचा खून केला! पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रकरण असे, कलियुग पासवान  (Kaliyug Paswan)यांच्या मोठ्या मुलीचा विवाह मुस्तफापूर येथील राजेश या युवकाशी झाला होता. लग्नानंतर काही वर्षांनी राजेश  सासऱ्यांच्या घरी राहू लागला. या काळात त्याने सासूसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. सासू आणि जावयाच्या या संबंधाची चर्चा गावभर झाली होती.

लॉकडाऊनच्या काळात सासरा कलियुगसुद्धा लुधियानाहून घरी आला होता. तो शेती करत होता. पिकाची देखभाल करण्यासाठी शेतातच झोपडी बांधून राहात होता.तरीही सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधात सासरा कलियुग अडसर ठरत होता. कलियुगचा खून झाला. हा खून राजेशने केला असा आरोप आहे.

बांकाचे एसडीपीओ दिनेश चंद्र श्रीवास्तव यांनी याची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितलं की अनैतिक संबंध आणि हत्येची अन्य कारणे  लक्षात घेऊन चौकशी आणि तपास केला करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER