‘लव्ह आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट १० वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता दहा वर्षांनंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही नवीन जोडी ‘लव्ह आज कल’मध्ये पाहायला मिळतेय. या जोडीबद्दल चाहत्यांना कमालीची उत्सुकता असून पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंतीस उतरली आहे .


तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दोन जोडप्यांच्या प्रेमकहाणीची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र या प्रेमकथांचा काळ वेगवेगळा आहे. यात एक सध्याच्या घडीची कथा तर एक जुन्या काळातील प्रेमकथा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सारा आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सारा-कार्तिकसोबतच यामध्ये रणदीप हुड्डाचीही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.