कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात ‘कमळ’ खुलणार; भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा

karnataka

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आले आहे. आज कर्नाटक विधानसभेत झालेल्या मतदानात ९९ विरुद्ध १०५ अशा फरकाने कुमारस्वामींचे सरकार कोसळले. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल.

आज मंगळवारी दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपने काँग्रेसचे १५ आमदारांना फोडत, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा आहे. परिणामी कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. अवघ्या २० महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल. असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ही बातमी पण वाचा : कर्नाटक : कुमारस्वामींचे सरकार कोसळलं

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत २२४ आमदार असल्याने बहुमतासाठी ११३ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने ९५ आणि विरोधात १०५ मतदान झाले आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले आहे.

बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे कुमारस्वामी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देतील. भाजपाकडे बहुमत असल्याने भाजपा नेते येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. त्यानंतर, बहुमत सिद्ध केल्यास भाजप सत्तेवर येऊ शकते. राज्यपाल बजुभाई वाला यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. वजुभाई वाला हे येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊ शकतात. त्यानंतर भाजपाला बहुमत सिद्ध करावे लागेल. कर्नाटकतील राजकीय नाट्यावेळी राजीनामा दिलेल्या आमदारांचा कदाचित नवीन मंत्रिमंडळात शपथविधी होऊ शकतो.

काँग्रेसच्या बाजुने ९९ मते पडली तर विरोधात १०५ मते होती. भाजपाचे विधानसभेतील बलाबल १०५ असल्याने ही मते विरोधात पडली. कर्नाटकमध्ये प्रत्यक्ष आमदार मोजून बहुमत चाचणी घेण्यात आली. बहुमताचा मॅजिक आकडा गाठण्यात जेडीएसला अपयश आले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाटक संपुष्टात आले आहे. काँग्रेसकडून डी.के. शिवकुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, हे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. भाजपने खेळी करीत काँग्रेसची सत्ता पाडण्यात यश मिळविले.

कर्नाटकमधील आजचे मतदान

भाजपाच्या बाजुने – १०५ भाजपा

सरकारच्या बाजुने –
६८ काँग्रेस
३४ जेडीएस
०२ अपक्ष
०१ बसप