कमळ – सुंदर मनमोहक धार्मिक आणि आरोग्य हितकर !

Lotus

नवरात्र, धनत्रयोदशी तसेच लक्ष्मीपूजन या दिवशी कमळाचे फूल नक्कीच आणल्या जाते. देवीची पूजा करतांना कमळाचे फूल वाहणे धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानल्या जाते. कमळाचे फूल सुंदर मनमोहक, विविध रंगात आपल्याला बघायला मिळते. अनेकजण घरीसुद्धा कमळाचे कुंड तयार करतात. कमळाचे औषधी व आहार्य असे दोन्ही उपयोग आहेत.

पद्म, अरविन्द, नलिन, महोत्पल, सहस्रपत्र, शतपत्र, पंकेरुह, तामरस अशी कितीतरी नावे कमळाकरीता आली आहेत. पाण्यात उगविणारे सुंदर क्षुप असते कमळाचे. कमळाचे बीज कमलनाल, कमल काकडी, कमलकंद, याचा भाजीकरीता उपयोग होतो. कमळाचे फुल देवाला वाहण्याकरीता वापरले जाते. श्वेत लाल नील कमल अशी विविध रंगी कमल फुलं असतात.

कमळ पाण्यात उगवणारे असल्याने उष्णता कमी करणारे आहे. थंड आहे. आयुर्वेदात कमळाच्या फुलांचा उपयोग वर्ण चांगला करणाऱ्या लेपांमधे केला आहे. उन्हाळा वा शरद ऋतुमधे शरीराची उष्णता त्वचेची आग कमी करण्याकरीता कमळाच्या फुलांना वाटून त्याचा लेप चेहऱ्याला लावतात. त्वचेचा वर्ण उजळतो तसेच थंडवा जाणवतो.

  • हृद्रोग किंवा हृदयाचे संरक्षण करण्याकरीता कमळ फुलांचा लेप हृदयाच्या ठिकाणी लावतात.
  • कमळ उन्हाळी लागणे, लघवीची आग होणे यामधे सुद्धा प्रभावी काम करते.
  • उन्हामुळे वा पित्त वाढल्याने होणाऱ्या शिर शूल होत असेल तर कमळाच्या फुलांचा वाटून लेप लावतात.
  • अतिसार, मूत्रविकार, रक्तस्त्राव अशा तक्रारीवर प्रभावी कार्य करते.
  • लहान मुलांकरीता टॉनिक सारखे काम करणारे अरविंदासव कमळाचा उपयोग करून बनविले जाते.

कमळाचे फुल सुंगंधी मनमोहक असतेच पण त्याचा प्रत्येक अंग विशेषतः पुष्प बीज मूळ हे औषधी दृष्टीने खूप फायदेशीर आहे. असे हे धार्मिक महत्त्व असलेले तेवढेच आरोग्याला हितकर पुष्प !

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER