पुणे पदवीधर देशमुख यांना भाजपकडून लॉटरी

Sangram Singh Deshmukh

सांगली :- पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ग्रीन पॉवर शुगर या गोपुज (जि. सातारा) येथील साखर कारखान्याचे संस्थापक आहेत. येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्यांना पदवीधरसाठी तयारीला लागा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. भाजपने नाव जाहीर करून प्रचार यंत्रणेला वेग देण्यात आघाडी घेतली आहे. भाजपकडून शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, माणिक पाटील-चुयेकर आदी नावांची चर्चा होती. त्यात संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली.

सांगली, सातारा आणि पुणे या तीन जिल्ह्यांशी देशमुख यांचा थेट कनेक्ट आहे. ते याआधी दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. गेल्या विधानसभा निवडणुकाला त्यांनी कडेगाव पलूस विधानसभा मतदार संघातून तयारी केली होती, मात्र ऐनवेळी युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे संग्रामसिंह यांना रिंगणाबाहेर थांबावे लागले. भाजपसोबतच राहू, थोडी प्रतिक्षा करू, अशी भूमिका घेतली त्याचे फळ या उमेदवारीतून मिळाल्याचे सांगितले जाते.

Graduate election candidacy

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER