
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अध्यक्षांच्या विरोधात अविश्वस ठराव मांडण्याची संहिता दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात तयार झाली. त्यानंतर दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक, अन्य आठ कलाकारांची जुळवाजुळव करून अखेर ये यशस्वी करण्यात आली. अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आमदारकीच्या नादाने चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपदही गमावले, अशी चर्चा आता रंगली आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळात गेल्या वर्षभरापासून अध्यक्षांच्या विरोधात अंतर्गत खदखद सुरू होती. त्यातच भोसले यांनी विधान परिषद आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून महाकलामंडळ संस्थेची स्थापना करून साठ वर्षांचा इतिहास असणाऱ्या चित्रपट महामंडळाला महाकलामंडलच्या दावणीला बांधले, याचा राग संचालक मंडळात होता. त्यातच साखर चोरी व चेक चोरी आरोपांची त्यात भर पडली. भोसले यांना पदावरून हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यात मुंबईच्या कलाकाराने पुढाकार घेतला.
अविश्वास ठरावाची संहिता तयार झाल्यानंतर अन्य कलाकार (संचालकांची) जुळवाजुळव सुरू झाली. एका माजी अध्यक्षांनी पडद्यामागे सूत्रधाराची जबाबदारी स्वीकारली. विद्यमान अध्यक्ष अविश्वास ठराव यशस्वी झाला. आता नवीन अध्यक्ष निवड प्रक्रिया रंगणार आहे. महामंडळाची लवकरच निवडणूक होत आहे. त्यामुळे आता जरी प्रभारी अध्यक्ष म्हणून यमकर यांची नियुक्ती शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला