पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता इरफान खानला वाहिली श्रद्धांजली

PM-modi-paid-tribute-to-irrfan-khan

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खानचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्याची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही इरफानच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. “इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो. ” असे मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून इरफान यांना भावपूर्ण श्रद्धांजली