सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसचे नुकसान, माणिकराव ठाकरेंची नाराजी

manikrao-thakare

मुंबई : सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद न घेतल्याने काँग्रेसचे नुकसान झाले आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी म्हटलं आहे. केंद्रीय पक्षनेतृत्व  या बाबतीत विचार करेल अशी आशा आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने नेहमी सामाजिक संतुलनाचा विचार केला आहे, असंही ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत सुरू असलेल्या चर्चेवर ते म्हणाले की, ओबीसी आणि विदर्भातून या कॉम्बिनेशनवर निवड अशी चर्चा आहे. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी शासकीय पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींनी अशा पदावर नसलं पाहिजे या मताचा मी आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नव्या अध्यक्षाची निवड होईल.

तसेच मी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही. मी प्रदेशाध्यक्षपद मागणे संयुक्तिक नाही. एकाच वेळी पक्ष आणि सरकार यात पक्षाला न्याय देता येत नाही. पक्ष हा कायम प्राधान्य असला पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी सर्व खुलासे केले आहेत. त्यामुळे आता इतरांनी त्यावर बोलणे योग्य नाही, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER