प्रभू रामचंद्र नेपाळी! पंतप्रधानांच्या विधानानंतर विरोधक संतापले

PM KP Oli

खरी अयोध्यानगरी भारतात नसून नेपाळमध्ये आहे, तर प्रभू रामचंद्रही नेपाळी होते, असा जावईशोध नेपाळचे पंतप्रधान के पी ओली (K P Oli) यांनी लावला. आपली सत्ता जात असल्याचे पाहून ओली सातत्याने भारताला लक्ष्य करत आहेत. सोमवारी त्यांनी दावा केला की सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने ‘बनावट अयोध्या’ तयार केली. खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे. त्यावेळी आधुनिक वाहतूक आणि मोबाईल फोनसारखी दळणवळणाची साधने नव्हती, मग राम जनकपुरात कसे आले? असा प्रश्न त्यांनी विचारला.

ओली यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले आहे. नेपाळमध्येच (Nepal) अनेक नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा उघडपणे विरोध केला आहे. तसंच सध्या भारत आणि नेपाळमध्ये ताणावाचं वातारवण आहे. अशा परिस्थितीत ओली यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER