प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही ; राज ठाकरेंना आम्ही मार्गदर्शन करू – संजय राऊत

Raj Thackeray & Sanjay Raut

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसेकडून तशी तयारीदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले आहे.

“राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावंसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अयोध्या दौरा केल्यानं शिवसेनेनं तिथं राम मंदिराच्या आंदोलनात ऊर्जा भरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं तरी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे. अयोध्येत मंदिर कुठं आहे, रामलल्ला कुठं आहेत, कोणकोणती मंदिरं आहेत, शरयूच्या काठावर कसं जायचं अशा गोष्टींचं आम्ही नक्की त्यांना मार्गदर्शन करू.” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : ‘आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या येड्यानी विसरु नये’- संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER