‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक !’ कांदा निर्यातबंदीविरोधी राष्ट्रवादीचे आंदोलन

Nationalist movement against onion export ban

मुंबई : राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट अजूनही कायम आहे. कोरोनात अनेक लोकांनी नोक-या गमावल्या आहेत. कित्येक जण मिळेल तो व्यवसाय करत आहेत. त्यातही कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी राबराब राबला आहे. आता लॉकडाऊन (Lockdown) शिथिल केल्यानंतर अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला आहे. ठिकठिकाणी आंदलनंदेखील छेडण्यात आलीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीनेही (NCP) केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधा आंदोलन केले. कांद्याच्या गोण्या रस्त्यावर ओतून हे आंदोलन करण्यात आले.

सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून तो लवकरात लवकर मागे घ्यावा. ‘शेतकऱ्यांची लूट हीच मोदी सरकारची भूक’ अशा घोषणा देत कांदा निर्यातबंदी त्वरित उठविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शेतीला चालना देण्याऐवजी केंद्र सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवून शेतकर्‍यांना देशोधडीस लावण्याचे काम करीत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER