ड्रग्ज तस्करांवर गुप्तचर यंत्रणेची नजर, फंडिंग कुणाला

Drugs

नागपूर :- ड्रग्ज आणि शस्त्र तस्करीच्या पैशातून दहशतवादी कारवांयासाठी फंडिंग केले जाते.ड्रग्ज माफियाच्या नागपूर येथील जाळ्याचा नागपूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी नुकताच छडा लावला आहे.दरम्यान या तस्करांवर गुप्तचर यंत्रणेने नजर रोखली आहे.

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मध्यभारतातील ड्रग्ज माफिया फिरोज खान उर्फ आबू याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा ताजबाग भागात अड्डा असून, तो त्याचे हस्तकामार्फत ग्राहकास मालाचा पुरवठा करतो.तो मात्र आपल्या आँफीस मध्ये बसून असतो व तेथून सूत्र हलवितो.मुंबई स्थित मुंब्रा येथील सत्तार नावाचा माणूस येथे ड्रग्जची खेप घेऊन येतो व नंतर तो येथील तस्करांना पुरवितो असे सूत्रानुसार समजते.मुंबईत ड्रग्ज माफियांचे मोठे जाळे असून, देश विदेशा पर्यंत त्यांचे नेटवर्क आहे.ही गोष्ट लक्षात घेता होणाऱ्या ड्रग्ज च्या चोरट्या व्यापारातील पैशातून दहशतवाद्याना फंडिंग तर केले जात नाही ना? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अंमली पदार्थ प्रकरणी यापूर्वी पोलिसांनी जावेद उर्फ बच्चा अत्ताउल्ला खान ताजबाग,अमीर खान आतिक रा.धारावी मुंबई, मो. वकार उर्फ गौस मोहम्मद अनिस रा. गायत्री प्लाझा ,व तडीपार अरशद अहमद अशफाक अहमद या चार जणांना अटक केली असून, त्याच्या अन्य साथीदारांवर पोलिसांनी नजर रोखली आहे.

(विनायक पुंड)