लंडन रिटर्न लोकांची शोध मोहीम

लंडन रिटर्न लोकांची शोध मोहीम

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) गेल्या दोन आठवड्यांत इंग्लंडवरून जे सात हजार लोक आले आहेत, त्यांचा शोध घेण्यात येईल. तसेच त्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन स्ट्रेनने ब्रिटनमध्ये (Britain) थैमान घातले आहे. सावधगिरी म्हणून भारताने गेल्या मंगळवारपासून इंग्लंडला जाणारी व येणारी विमाने रद्द केली आहेत.

दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांत इंग्लंडहन आलेल्या ७हजार लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. तेथून आलेल्या २५ लोकांना कोरोना झाल्याचे नुकतेच आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या लोकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या लोकांमध्ये नवीन स्ट्रेन आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.

दिल्लीत गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ९३९ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना संक्रमित लोकांची संख्या यानंतर ६ लाख १८ हजार ७४७ वर गेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER