लोकसभेच्या सभापतींनी राहुल गांधींना करून दिली सभागृहाच्या प्रतिष्ठेची आठवण !

Om Birla - Rahul Gandhi

नवी दिल्ली :- काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) आपली भूमिका मांडताना आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) सडकून टीका केली. यावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ सुरू होता. राहुल गांधी अर्थसंकल्पावर बोलण्याऐवजी शेतकरी आंदोलनावरून लोकसभेत आक्रमक झाले. मी बजेटवर बोलणार नाही, केवळ शेतकऱ्यांवरच बोलणार. जे २०० शेतकरी शहीद झाले त्यांना तुम्ही श्रद्धांजलीही दिली नाही. माझ्या भाषणानंतर दोन मिनिटे श्रद्धांजलीसाठी उभा राहीन, तुम्हीही साथ द्या, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर राहुल गांधी यांनी लोकसभेत शेतकऱ्यांसाठी दोन मिनिटं मौन पाळलं. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या इतर खासदारांनीही संसदेत मौन पाळलं.

राहुल गांधींनी घेतलेल्या या भूमिकेवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी नाराजी जाहीर केली. राहुल गांधींच्या भाषणावेळी लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही, असं लोकसभेचे सभापती म्हणाले. याशिवाय आपण मला सभागृहाच्या अध्यक्षपदी निवडून दिले आहे. सभागृहात कुणाबद्दलही श्रद्धांजली अर्पण करायची असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव लिखित स्वरूपात तुम्ही मला पाठवावा. मी सभागृहातील इतर सदस्यांसोबत चर्चा करून निर्णय घेईन, असं सभापतींनी राहुल गांधी यांना सांगितलं.

या सभागृहाला चालवण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. तुमच्यापैकी कुणी एकजण उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटं मौन पाळणार असं म्हणतं. कुणी सांगणार, मी बॉर्डरवर शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पण करणार. याबाबतची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे. तुम्ही मला बोलू देत नाही. तुम्ही सर्वांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे, असं सभापती म्हणाले.

यापुढे सभापती म्हणाले, सभागृहात अशा प्रकारे वागणं योग्य नाही. याशिवाय ते नियमातही नाही. सैनिकांप्रती संपूर्ण सभागृहाचा, १३० कोटी जनतेचा सन्मान आहे. सभागृहाच्या प्रतिष्ठेची आणि चालवण्याची जबाबदारी मला देण्यात आली आहे. याबाबतचा तुमचा कुठलाही विषय असेल तर लिहून द्या. मी आपल्या विषयावर सभागृहातील सदस्यांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेईन. पण सभागृह चालवण्याची जबाबदारी तुम्ही ज्याला दिली आहे, त्याला जबाबदारी पार पाडू द्या, असे सभापती ओम बिर्ला म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER