…तर चंद्रकांत पाटील कोल्‍हापुरातून लोकसभा लढणार

loksabha-election-chandkarant-patil-candidate-kolhapur

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप पक्षातर्फे प्रभावी उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यासाठी रणनीती आखली जात आहे . शिवसेना -भाजपमध्ये युतीबाबतचा कोणताही निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही . तरीही भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार लढणार नाहीत

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकसभेसाठी आवर्जून उमेदवारी द्यावी, असा आग्रह भाजपमधूनच सुरू आहे. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. भाजपने तसा निर्णय घेतला तर पालकमंत्री पाटील यांना कोल्‍हापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल . त्यामुळे पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक उभे राहतील; पण आजघडीला पाटील यांचा ओढा महाडिक यांच्याकडे जास्त असल्याने ते पेचात सापडले आहेत

ही बातमी पण वाचा :- राज ठाकरे पेचात ; लोकसभा निवडणुकीबाबत अद्यापही निर्णय नाही