राज ठाकरे पेचात ; लोकसभा निवडणुकीबाबत अद्यापही निर्णय नाही

Lok Sabha elections are not yet decided-MNS

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली . दरम्यान या आघाडीसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही आघाडी करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत . मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांनीच महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचे सांगितल्याने मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे. पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज ठाकरेंसमोरचा पेच वाढला आहे.

ही बातमी पण वाचा:- मनसेला आघाडीत येण्याचे दरवाजे बंद………..

राज ठाकरे यांनी काल तातडीने सर्व शिलेदारांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. मात्र या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे . निवडणुकीबाबत निर्णय झाल्यास आपण स्वत: जाहीर करणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांनी, निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत राहतील असे वाटत नाही, असे सांगत मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावली; मात्र तीही निष्फळ ठरली .

ही बातमी पण वाचा:-  नगर दक्षिणमधून शरद पवारांनी निवडणूक लढावी; प्रमुख कार्यकर्त्यांचा आग्रह