अन् अटलबिहारी वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकारही शरद पवारांनी चीत केलं?

मुंबई :- एनडीए (NDA) सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव आला होता. त्यावर बोलताना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी (Atal Bihari Vajpayee) भूमिका मांडत जनतेला वाटते आमचे सरकार कायम राहावे. आम्हाला जनसेवेची संधी मिळावी. त्यामुळे हे सभागृह याच अनुषंगाने निर्णय घेईल असे मला वाटते …” असे म्हणाले होते. पण सभागृहाने वाजपेयींच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही . तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्या दिवशी सकाळीच बसपा सुप्रीमो मायावतींची भेट घेतली अन् अवघ्या 13 दिवसांचं वाजपेयींचं सरकार कोसळले.

बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी म्हणजे 17 एप्रिल रोजी सकाळी सकाळीच काँग्रेस नेते शरद पवार यांनी मायावतींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि भाजपचे डावपेच उधळून लावले. त्या दिवशी संसदेत संपूर्ण दिवस भर चर्चा सुरू होती. त्यानंतर संध्याकाळी मतदानाची वेळ आली तेव्हा वाजपेयी या अग्निदिव्यातून बाहेर पडतील असंच सर्वांना वाटत होतं. मात्र, मतदानानंतर स्क्रीनवर जेव्हा मते दाखविण्यात आले तेव्हा संसदच नव्हे तर संपूर्ण देश आश्चर्यचकीत झाला. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांनी धीर गंभीर आवाजात मते जाहीर केली. आय 269, नो 270. केवळ एका मताने वाजपयीनचे सरकार पडले.

ही बातमी पण वाचा : क्रिकेट असेशिएशनच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे पाय चाटायला कोण गेलं होतं : शिट्टी यांचा आशिष शेलाराना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER