लोहा: मतदान प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन करा- निवडणुक निर्णय अधिकारी बोरगावकर

लोह्यात दुसरे मतदान प्रशिक्षण संपन्न

लोहा तालुका प्रतिनिधी : मतदान प्रक्रिया सुटसूटीत पारदर्शी पार पाडण्यासाठी मतदानाच्या प्रक्रियेत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कांही तांत्रिक अडचण वा अन्य तक्रारी असतील तर संबधितांशी संपर्क करावा असे मार्गदर्शन निवडणुक निर्वाचन अधिकारी श्री.पी.एस.बोरगावकर यांनी केले आहे.

लोहा तहसिल कार्यालयात विधानसभा निवडणुकी संदर्भात कर्मचा-यांचे दुसरे प्रशिक्षण डिजिटल-हायटेक पध्दतीने पार पडले. निवडणुक विभागाचे उप-जिल्हा निवडणुक निर्वाचन अधिकारी पी.एस.बोरगावकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार .विठ्ठल परळीकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी सखाराम मांडवगडे, नायब तहसिलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचा-यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी निवडणुक आयोगाच्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन झाले पाहीजे. मतदान काळात कोणत्या उपाय योजना नोंदवही व फार्म भरुन घ्यायचे आहेत नोंदी कशा ठेवावे उद्भवलेले प्रसंग कसा निस्तरायचा इथपासून ते सर्व शंका कुशकांचे निरसन निर्वाचन अधिकारी पी.एस.बोरगावकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार परळीकर, तहसीलदार मांडवगडे व विजय चव्हाण यांनी केले तसेच महत्वाच्या सुचना दिल्या.

केंद्रीय निवडणुक निरिक्षकांची भेट दुसरे कर्मचारी प्रशिक्षण तहसील कार्यालयात पार पडले. त्या प्रशिक्षणास केंद्रीय निवडणुक निरिक्षक महिंदर पाल यांनी भेट दिली व टीम बोरगावकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणुक अधिकारी सोनाली राठोड, नायब तहसीलदार सौ.एन.व्ही.कुलकर्णी नायब तहसीलदार ताडेवाड, अशोक मोकले, देवराये तसेच अव्वल कारकून बडवणे, निवडणुक विभागाचे प्रमुख तिरुपती मुंगरे यासह यंत्रणा कार्यरत आहे.