मध्यप्रदेशात टोळधाड

Locusts  in Madhya Pradesh

भोपाळ : बुधवारी संध्याकाळी मध्यप्रदेशच्या पश्चिमेकडील १५ जिल्ह्यांमधील अनेक गावांत टोळधाड आली. पानबिहार जिल्ह्यातील राणा हेडा गावातील झाडांवर हजारो टोळ दिसले. रणहेरा गावात टोळ मारण्यासाठी फवारणी करण्यात आली. या भागात १२ चौरस किलोमीटर परिसरात औषधांची फवारणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या उपसंचालिका नीलम सिंह यांनी दिली.

हे टोळ राजस्थानमधून मध्यप्रदेशमध्ये आले, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यप्रदेशमधील उज्जैन, मंदसौर, नीमच, अगर-मालवा आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या टोळधाडींचा फटका बसला आहे. पानबिहारसोबतच नीमचच्या बाजूने आणलेल्या टोळधाडींमुळे हनुमंतिया, गुर्जर खेडी, खोर, नयागाव, केशरपुरा, कनका, सगराना या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

एवढ्या मोठ्या टोळधाडी आल्याने स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजस्थानमध्ये आलेल्या टोळधाडींच्या आठवणी जाग्या झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER