लॉकडाऊनमध्ये अडकेल्या तरुणाला घर गाठण्यासाठी 125 किलोमीटर पायी चालावे लागले

lockdown-youth-had-to-do-with-the-125-km-travel-on-foot

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्ण देशातील वाहतूक ठप्प झाली. विमानसेवा, रेल्वे सेवा, बस वाहतूक सगळ काही बंद झाले. मात्र लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणा-यांना मोठा फटका बसला. कामानिमित्ताने दुसरीकेड गेलेल्या मजुरांनाही त्रास सहन करावा लागला. कामानिमित्त गेलेल्या सिंदेवाहिच्या तरूणाला आपले घर गाठण्यासाठी तब्बल 125 किलोमीटर पायी चालावे लागले. अखेर त्याच्या मदतीला पोलिसही धावून आले.

सावली तालुक्यातील नरेंद्र शेळके हा तरूण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे साखर कारखान्यात मजूर आहे. लॉकडाऊनमुले तो तीन दिवसांपूर्वी नागपूरला आला होता. मात्र येथून गावाकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद होते. आणि नागपूरलाही राहण्याची सोय नव्हती. अखेर त्याने पायीच आपल्या गावाला जाण्याचे ठरवले. त्याने 125 किलोमीटरची पायपीट करत त्याने सिंदेवाही गाठले. दरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याने त्यावेळी त्याने त्यांना सर्व कहाणी सांगितली.

भुकेने व्याकूळ नरेंद्रच्या जेवणाची व्यवस्था सिंदेवाही पोलिसांनी केली आणि गावाला पोहोचूनही दिले. पोलिसांच्या या माणुसकीचे कौतुक होत आहे.