लॉकडाऊनमुळे त्रस्त पुण्याच्या एका व्यापा-याने किडनी काढली विकायला; ट्विटरवर जाहीरात

Pune Businessman Offers To Sell His Kidney

पुणे : कोविड -19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर गेल्या सात आठ महिन्यांपासून देशात, राज्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेकांनी आतम्हत्येचाही मार्ग निवडला आहे. त्यातच आता पुण्याच्या एका व्यापा-याने थेट आपली किडनीच विकायला काढली आहे. यासंबंधी त्याने ट्विटरवर जाहीरात दिली आहे.

“मला माझे मूत्रपिंड विकायचे आहे कारण आता मी माझे कुटुंब नैराश्येत आहे. माझी मुलं जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे. मी मालमत्ता सल्लागार आहे. माझी पत्नी खूप चांगली अभिनेत्री आणि चांगली नर्तक आहे पण माझ्याकडे काम नाही.” “मी महाराष्ट्रीयन आहे. माझा व्हॉट्सअ‍ॅप नंबर (sic) आहे,” असे त्या व्यापा-याने ट्विटमध्ये लिहिल आहे.

पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार सदर व्यापारी हा हडपसर-आधारित रिअ‌ॅल्टी डेव्हलपर आणि सल्लागार आहे. तो गेल्या 17 वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. आपला व्यवसाय कोसळल्यानंतर, तो सावरण्यासाठी, त्याने आधीच स्वत: ची मालमत्ता विकली आहे आणि आपल्या कुटुंबासाठी नवीन घर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतातील अवयवदानाच्या विक्रीबाबत आणि संबंधीत कायद्यांविषयी आपल्याला माहिती आहे असे सांगून त्यांनी पुणे मिररला सांगितले की, “माझ्या कठीण परिस्थितीत मला यापुढे दुसरा मार्ग दिसत नाही. मला कोणत्याही परिणामांची चिता नाहीमला आता अधिक काही गमवायचे नाही असे त्याने मिररला सांगितले आहे. तसेच, किडनी विकण्यासंदर्भात त्याने ट्विट केल्यानंतर त्याला काही फेन कॉलही आले आहेत. आणि फोनवर लोक त्याला कोट्यावधी ऑफर करण्यास तयार झालेत. असेही त्याने सांगितले.

तर, दुसरीकडे मानवी अवयवांची विक्री करणे हे भारतीय मानवी अवयव आणि ऊतक कायदा, 1994 नुसार बेकायदेशीर आहे. या कायद्यानुसार मानवी अवयवांच्या बेकायदेशीर जाहीराती किंवा विक्रीवर प्रतिबंध आहे. असे केल्यास कायद्याने हा गुन्हा ठरतो व संबंधीत व्यक्ती शिक्षेस पात्र ठरतो.

दरम्यान, दरम्यान, मागील २ तासांत पुणे जिल्ह्यात 2353 नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत पुण्यातील रुग्णांची संख्या 2,99,353 एवढी आहे असे आरोग्य अधिका-याने बुधवारी सायंकाळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER