१ जूननंतरही लॉकडाउन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; आरोग्यमंत्र्यांची माहिती

Rajesh Tope

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउन (Lockdown) कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही. मात्र, निर्बंध काही प्रमाणात शिथील होणार असल्याचे कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसे असेल, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नाही. १ जूननंतरही लॉकडाउन कायम राहणार आहे. मात्र, निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार बैठकीत झाला आहे. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करून निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत तौक्ते चक्रीवादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा करण्यात आली. मात्र, आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button