लॉकडाऊनमध्ये प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन; २७ हजारांवर गुन्हे दाखल

lockdown maharashtra

मुंबई : लॉकडाऊनमध्ये घोषित प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ८ एप्रिलपर्यंत पोलिसांनी २७ हजार ४३२ गुन्हे दाखल केले असून १८८६ जणांना अटक करण्यात आली. यात पोलिसांवर हल्ले, विलगवासाचे उल्लंघन, व्हिसा कायद्याचे उल्लंघन इत्यादींचा समावेश आहे.

याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

विलगवासाचे उल्लंघन – ४३८, पोलिसांवर हल्ले करणे – ६०१ व या प्रकरणी अटक १६१, बेकायदा वाहतूक ९७७, एकूण अटक १८८६ जण. १२ हजार ४२० वाहने जप्त करण्यात आली असून ९५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. परदेशी नागरिकांनी व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून यात मुंबईत ३ गुन्हे ३२ आरोपी, अहमदनगर ३ गुन्हे २९ आरोपी, अमरावती शहर २ गुन्हे १८ आरोपी, पुणे शहर १ गुन्हा ८ आरोपी, नागपूर शहर १ गुन्हा ८ आरोपी, ठाणे शहर १ गुन्हा २१ आरोपी, चंद्रपूर १ गुन्हा ११ आरोपी, गडचिरोली १ गुन्हा ९ आरोपी आणि नांदेड १ गुन्हा १० आरोपी- अशी आकडेवारी आहे. कोविड – १९ प्रकरणी ५८ हजार ९ तक्रारींची चौकशी करण्यात आली असून दोन पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.