१५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढणार? ३० तारखेला नियमावली जाहीर होण्याची शक्यता

lOCKDOWN

मुंबई :- १४ एप्रिल संध्याकाळपासून राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. तो १ मे रोजी सकाळी ७ वाजता संपणार असल्यामुळे आता पुढे काय? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला असून लॉकडाऊन (Lockdown) वाढवावाच लागणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाल्याची माहिती राजेश टोपेंनी (Rajesh Tope) दिली.

राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असून ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली असून, अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारायला नर्सिंग स्टाफची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे, १ मेनंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आदी मुद्यांवर चर्चा होत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळे काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आटोक्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे. मात्र, हा लॉकडाऊन किती दिवसांसाठी वाढविण्यात येईल, याचा तपशील लवकरच जाहीर होईल. पण, तो १५ दिवसांसाठी वाढविण्यात यावा, असं माझं वैयक्तिक मत आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, राज्यात १५ मेपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लागू असतील, असे एकंदरीत दिसून येत आहे.

ही बातमी पण वाचा : राज्यात १८ ते ४४ वर्षाच्या प्रत्येकाला मोफत लसीकरण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button