लॉकडाऊनमध्ये शाहरुखने घरी जेवण बनवून पत्नी मुलांना खाऊ घातले

Shah Rukh Khan spends quality time with family.jpg

चित्रपटसृष्टी गेल्या सहा महिन्यांपासून बंद असली तरी शाहरुख खान (Shah Rukh Khan) मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरीच आहे. 2018 मध्ले आलेला झीरो चित्रपट सुपरफ्लॉप झाल्यानंतर शाहरुखने कोणताही नवा चित्रपट साईन केला नाही.

लॉकडाऊनमध्ये तर शाहरुख 24 तास घरीच असायचा. घरी बसून शाहरुख जेवण बनवायचा आणि आम्हाला खायला घालायचा असे त्याच्या पत्नीने गौरीनेच सांगितले. गौरीने म्हटले, लॉकडाऊनमुळे संपूर्ण कुटुंब प्रथमच इतका वेळ एका छताखाली एकत्र राहिले. मात्र घरात असले तरी सुहाना तिच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये व्यस्त होती तर आर्यन दिवसभर आराम करायचा, चित्रपट पाहायचा. गेम्स खेळायचा. अबराम सतत सगळ्यांबरोबर खेळत असायचा. खरे तर त्याला बाहेर जाऊन खेळण्याची आवड परंतु नाईलाजाने त्याला घरात खेळावे लागत होते. शाहरुखबाबत बोलताना गौरीने सांगितले, कोरोना संसर्गाची भिती असल्याने आम्ही बाहेरून जेवण मागवण्यासही घाबरत होतो. त्यामुळे घरातच जेवण बनवायचो. आणि तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल, शाहरुख स्वतः जेवण बनवायचा. त्याला जेवण बनवायला खूप आवडते आणि मला खायला. मुलांनीही वडिलांच्या हातच्या जेवणावर चांगलाच ताव मारला. त्यामुळे आता शाहरुखला अधे मधे घरी जेवण बनवावेच लागेल असेही गौरीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER