मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार लॉकडाऊन पॅकेजवर चर्चा!

uddhav Thackeray - Ajit Pawar - Maharastra Today
uddhav Thackeray - Ajit Pawar - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय ११ एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर (Lockdown) चर्चा झाली. महाराष्ट्रात ८ किंवा १४ दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार आहे. आजचा बैठकीत अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने (BJP) लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. याशिवाय तिन्ही विभागाचे सचिवदेखील बैठकीत हजर आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे.

लॉकडाऊन ८ की १४ दिवस?

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ११ एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात ८ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत मांडले. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान १४ दिवसांचा लॉकडाऊन केल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल, असे मत व्यक्त केले.

“कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात ८ किंवा १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही, पण जगानेही तो स्वीकारला आहे. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button