लॉकडाऊन ८ की १४ दिवसांचा? दोन दिवसांत निर्णय घेणार- मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कडक लॉकडाऊनची (Lockdown) गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. मात्र, किमान ८ दिवस कडक लॉकडाऊन गरजेचे आहे. ८ दिवसांनंतर एक एक गोष्ट हळू हळू सुरू करू, अशी भूमिका मुख्यमंत्र्यानी घेतली असून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : पूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होईल; फडणवीसांचा इशारा

राज्यातील स्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ. तसंच सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील स्थिती पाहता जनतेला थोडी कळ सोसावी लागेल.  लॉकडाऊन करायची वेळ आली आहे; कारण यंत्रणांचा शक्तिपात होऊ नये. कोरोनाची लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन कोरोनाच्या लसीलाही जुमानत नाही. त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही; पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाच वेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button