
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे आता प्रशासन सावध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल कोरोनाबाबत चिंता व्यक्त करत लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नये असे म्हटले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊन (Lockdown) हाच एक अंतिम पर्याय असेल असा इशारा दिला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला. लॉकडाऊन हा आमच्यासाठी अंतिम पर्याय असेल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, कोरोनाच्या रुग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी आम्ही दोन गोष्टी ठरवल्या आहेत. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक कारवाईचे पालन करत नसतील तर कारवाई करण्याची मोकळीक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी सांगितले.
पुन्हा लॉकडाऊन?
महाराष्ट्रात कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी 3 हजार 365 नवे रुग्ण मिळाले. पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास 21 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे.
ही बातमी पण वाचा : नियम पाळा नाही तर पुन्हा लॉकडाऊन अटळ!; सामनातून इशारा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला