नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउन; नितीन राऊत यांची घोषणा!

Nitin Raut

नागपूर :- नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Corona Crises) वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउन (Lockdown) करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. येत्या १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत नागपुरात (Nagpur News) लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीत नागपुरात लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करावे आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

“नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार, रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाउनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाउन करावा लागत आहे. यात खाजगी कार्यालय बंद राहतील, शासकीय कार्यालय २५ टक्के उपस्थित सुरू राहणार, लसीकरण सुरू राहणार, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचे दुकान सुरू राहतील, मद्यविक्री बंद राहतील.” असे नितीन राऊत यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. बुधवारी (काल) नागपुरात २४ तासात १ हजार ७१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १लाख ६१ हजार ०५३ झाली आहे. आज ८ रुग्णांच्या मृत्यूने एकूण मृतांची संख्या ४ हजार ४१५ वर पोहचली. विशेषतः बुधवारी १० हजार ५४८ चाचण्या झाल्या. या तुलेनत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १६.२१ टक्के इतके झाले आहे.

 

lockdown order
lockdown order
lockdown order

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER