महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत राहणार लॉकडाउन, ‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर

Unlock 4.0

मुंबई : राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. राज्य सरकारने आज ‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. खासगी तसेच मिनी बसेस व हॉटेल आणि लॉज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मंदिर आणि जिम यांच्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

शाळा, कॉलेज तसेच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरची बंधन कायम आहेत.

बंद राहणार

  • शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद.
  • चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरची बंधन कायम.
  • आंररराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी असेल तर मुभा
  • मेट्रो बंदच
  • सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी कायम

Check PDF :-Lockdown Mission Begin Again Order 31.8.2020

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER